शिकून सवरूनच प्रत्येकजण मोठा व चांगला माणूस बनू शकतो - पत्रकार मिडगुले चाकण येथील प्रशालेत ज्ञानयोग अगरबतीतर्फे हरीपाठ वाटप व मार्गदर्शन

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
        माणूस जिवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो . एकतर श्रीमंताच्या घरास जन्मला तर व दुसरे शिकून सवरून . आता कुणाच्या घरात जन्म घ्यायचं हे कुणाच्याही हाती नसतं, पण मन लावून शिक्षण घेऊन व सवरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द - सत्य , सदाचार, सुविचार,संताचे विचार अंगिकारत त्याप्रमाने वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केल्यास आपण नक्की मोठा आणि चांगला
माणूस बनू शकतो , असा विश्वास पत्रकार मिडगुले यांना चाकण येथील जि . प . प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला  
या जिवनाची शर्यत जिंकायची असेल तर ससा कासवाचे गोष्टीतील कासवाप्रमाणे सतत नियमीत अभ्यास गृहपाठ व्हावा . छोट्याशा मुंग्या महत्प्रयासे धान्यकण जमवून भविष्यात पुरेल एवढा साठा आपले बिळात करून ठेवतात . ती एवढीसी मुंगी तिच्या लहानशा डोक्यातला चिंटुकला मेंदू वापरत खाद्य साठा करते , कारण तिला पावसाळ्यात बाहेर पडलेस धोधो पाऊस पुराचे लोंढ्यात वाहून मरून जाऊ उमगते . तसे मुलांनी या प्राथमिक शाळेत पुढील जिवनभर पुरेल इतके ज्ञान विद्या मिळविली पाहीजे . कारण हा जिवनाचा खरा पाया असतो . कोणतीही बहुमजली उतुंग इमारत उभारणेसाठी पाया पक्का असावा लागतो , असे मिडगुले यांनी सांगीतले . मुख्याध्यापक व शिक्षकांचे हस्ते मुलांना प्राती निधीक स्वरुपात ज्ञानयोग अगरबती तर्फे हरीपाठ वाटप करणेतआले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!