सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ,वाघापूर संचलित पारेश्वर विद्यालय, पारगाव मेमाणे या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव ' भारत ७५ ', एक राखी जवानांसाठी व 'हर घर तिरंगा 'या लोकजागृती कार्यक्रमाचे आयोजन केंद्र शासनाच्या सूचनांनुसार शाळा समिती, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी पारेश्वर विद्यालय , पारगाव मेमाणे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ' भारत- ७५' उपक्रमांतर्गत मानवी साखळीद्वारे भारताच्या नकाशाची प्रतिकृती बनवली. तसेच रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून भारतीय सीमेवरील सीमांचे रक्षण करणाऱ्या तवांग, अरुणाचल प्रदेश - चीन सीमेवरील जवानांच्या साठी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः राखी व भेटकार्ड बनविलेले शाळेने पोस्टाद्वारे पाठविले. त्याबरोबरच शाळेत अमृत महोत्सवानिमित्त निबंध,वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा, लेखन, वाचन, शुद्धलेखन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी सांगितले. शाळा समिती अध्यक्ष, सर्जेराव मेमाणे, संचालक लक्ष्मण गायकवाड, सरपंच प्रियंका मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे व ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले. याकामी शाळेतील विद्यार्थ्यांना उपशिक्षक दत्तात्रय बधे, उस्मान मण्यार, सारिका सातव, रजनी कड, शंकर वाघमारे, अरुण खेडकर, मोहन कुंभारकर, अण्णा लोंढे व रमेश पैठणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.