शिरूर विशेष प्रतिनिधी
मलठण (ता शिरूर) येथे पंचायत समिती शिरूरच्या वतीने पार पडलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र केंदुर येथील कर्मचारी यांना कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते कोरोणायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार आरोग्य सहाय्यक डॉ.मोहन रुके,आरोग्य सेवक डॉ.सचिन चोपडा,सुजित राऊत,शशिकांत दरंदळे यांनी स्वीकारला.
मलठण येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव करून त्यांना शुभेच्छा वळसे पाटील यांनी दिल्या.यावेळी वळसे पाटील बोलताना म्हणाले, कोरोणाच्या महामारीत देशावर महाभयंकर संकट निर्माण झाले होते.हे संकट सहजासहजी कमी झाले नसते पण अशा वेळी आपण शक्य होईल तिथे कोविड केंद्र उभारले,त्याठिकाणी या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली.प्रत्येक रुग्णाची वेळोवेळी तपासणी करून रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की,आपल्या ग्रामीण भागात देखील अनेक रुग्ण कोरोणाचे होते पण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी या भागातील जनतेकडे लक्ष देऊन शासनामार्फत मलठण,पाबळ,टाकळी हाजी या परिसरात कोविड केंद्र उभारले.या केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा केली.
यावेळी कार्यक्रमास शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटरावजी गावडे, शिरूर-आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,गटविकास अधिकारी अनिल देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रश्नांत जगताप, मलठण गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.