सासवड बापू मुळीक
सासवड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे ( झिंजुर्के ) यांना उत्कृष्ट तपासा बद्दल पोलीस महासंचालकांच्या हस्ते अपराधसिद्धी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
२०२० मध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने १३ वर्षाच्या बालकावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस शिफातीने अटक केले पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने उत्कृष्ट तपास करून गुन्हेगारा वरील आरोप सिद्ध केला. याबद्दल तपास पथकाला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.
२०२० मध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नराधमाने १३ वर्षाच्या बालकावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ गजाआड केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांच्या तपास पथकातील सहकारी सहायक पोलीस फौजदार गणेश झाजरे, पोलीस हवालदार चंद्रकांत कांबळे, पोलीस नाईक शरद पाटील यांच्या पथकाने उत्कृष्ट तपास केला. या प्रकरणाचा काही दिवसांपूर्वीच निकाल लागला असून न्यायालयाने आरोपीस तब्बल २० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, सुरेश मेखला, सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते पोलीस खात्यातील विशेष अपराधसिद्धी हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
याबद्दल पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सासवड पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के आदींनी सुप्रिया दुरंदे यांचे अभिनंदन केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे सध्या सासवड पोलीस ठाण्यात निर्भय पथकाच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत. कोरोना काळातही त्यांनी उत्कृष्ट काम केले असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सासवड आणि परिसरातील शाळा, महाविध्यालयांमध्ये युवक, युवतींना कायद्याचे मार्गदर्शन करीत आहेत. कॉलेज परिसरात आणि रस्त्यावर टुकारगिरी करणाऱ्यां अनेक सख्या हरींवर कायद्याचा धाक दाखविला आहे. अल्पवयीन मुलींचे आणि मुलांचे प्रबोधन केले जात आहे.