शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
शिक्रापूर-चाकण रस्त्यावर कंटेनरची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना शिक्रापूर येथे घडली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात या संदर्भात महेंद्र नेहरू पवार, (वय ३३ वर्षे, रा. दत्तप्रसाद कॉलणी शिक्रापूर, चाकण रोड, मुळ रा. बेगमपेठ महाला, सोलापूर ता.जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिल्याने कंटेनर चालक मुबारक समशेर शेख (वय २१ वर्षे, रा. वायफळ ता. जत, जि. सांगली) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर गावचे हद्दीत शिक्रापूर - चाकण रोडवर, जय गणेष बॅटरी समोरून महेंद्र नेहरू पवार हे त्यांच्या स्प्लेंडर मोटार सायकल (क्र. एमएच १२ सीई ५२७८ ) वरून मित्र आबासाहेब बबन ढेरे (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि.पुणे) समवेत जात असताना या दुचाकीच्या मागुन येणाऱ्या कंटेनर (क्र. केए २८ डी ३११७) ने धडक दिली. कंटेनर हयगईने, अविचाराने, निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवुन मोटार सायकलला पाठीमागुन धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही जखमी झाले.
शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने पुढील तपास करत आहेत.