सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
माजी मंत्री विजय शिवतारे, मातंग नवनिर्माण सेनेचे राज्याध्यक्ष म्हस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्षा रोहिणी शेंडगे, आबा खवले, लक्ष्मण मांढरे आदी उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' मिळावे, लहुजी वस्ताद साळवे आयोग लागू करावा, लहुजी वस्ताद यांचे स्मारक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी उभारावे, मुंबई येथे अण्णा भाऊंचे स्मारक बांधावे, शासकीय-निमशासकीय कार्यालयात अण्णा भाऊंची जयंती साजरी व्हावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हस्कू शेंडगे यांनी दिले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विनय झिझुर्के आदींसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व उपसाठांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास अभिवादन केले,