लोणीकंद येथे भव्य नोकरी मेळावा व मोफत जॉब कार्ड चे वाटप

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील

            महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार  अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नोकरी मेळावा व मोफत जॉब कार्ड  (नोकरी मार्गदर्शकाच्या) वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे लोणीकंद - पेरणेवाडे बोल्हाई - कोरेगाव मूळ, या दोन्ही  जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावांतील युवक युवतींसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.दोन वर्षांच्या कोरोना काळात, लॉकडाऊन मुळे अनेक लोक बेरोजगार झाले. अगदी उपासमारीची वेळ बर्‍याच कुटुंबांवर आली. शिवाय सुशिक्षित बेकारही अतिशय त्रासलेले आहेत. अपमानाचं जिणं ते जगतायत. या दाहक पार्श्वभूमीवर हा भव्य नोकरी मेळावा, गरजूंना खूप सहाय्यभूत ठरेल.
आपल्या परिसरातील 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यामध्ये असेल. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात येणार आहे. 5 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीच्या अंतिम परीक्षेस बसणार्‍या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्रदीपभाऊ वसंतराव कंद मित्रपरिवारातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने गावातील युवक युवतींनी या भव्य नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा! यासाठी नाव नोंदणी  https://bit.ly/3zZAX8w  या लिंक वर ऑन लाईन करावी अथवा ऑफ लाईन पद्धतीने पूर्ण भरलेला फॉर्म प्रदीपभाऊ कंद यांच्या कार्यालयात दि. 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान जमा करावा,नावनोंदणी केल्यानंतर कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा आपल्याला मोबाईलवर कळवण्यात येईल. 
आपला नम्र- प्रदीप वसंतराव कंद
सरचिटणीस - राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश
सदस्य - पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समिती

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!