सुनील भंडारे पाटील
केंदूर (ता शिरूर) येथील ठाकरवाडी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे एकाचे घर कोसळले, रामा रावबा गावडे असे घरमालकाचे नाव आहे, पाच वर्षांपासून शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत,
काल झालेल्या वळवाच्या मुसळधार पावसामुळे हे घर पडले असून या अगोदर पाच वर्षांपूर्वी तेच घर पडून त्या घरामध्ये एक छोटा मुलगा मृत्युमुखी पडला होता त्याची आई तिच्या पोटावर दगड पडून तिला पण जखम झाली होती त्या मुलाची आजी त्यांच्या पण डोक्यात मार लागला होता त्यावेळी केंदूर गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश थिटे, केंदूर गावचे तलाठी भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी केंदूर ग्रामपंचायत शिरूर नायब तहसीलदार यांनी भेट देऊन पंचनामा केला होता परंतु अद्याप त्यांना कुठलेही शासकीय मदत झाली नाही आणि पुन्हा पाच वर्षानंतर तोच प्रसंग त्याच कुटुंबावर दुसऱ्यांदा आलेला आहेआणि आज पुन्हा तेच घर पडून त्यामध्ये एक महिला जखमी झालेले आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे त्यांची नुकसान झालेले आहे ती जागा एसी झेड यांची आहे त्यांना घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी एसी झेड ची अधिकारी विरोध करत आहे त्या कामी, शासकीय अधिकारी, प्रशासन, स्थानिक लोकनेत्यांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे,