सुनील भंडारे पाटील
उद्याच्या नागरिकांना कायद्याचे ज्ञान व्हावे आणि त्यांच्या अंगी शिस्त बाणावी म्हणून शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय बुद्रुक यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा वस्तू उपक्रम राबवण्यात आला.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे एपीआय वैभव पवार यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांचे वाढलेले शिस्तीचे उल्लंघन त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबाबत कायद्याचे योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर त्याचबरोबर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कारंडे पोलिस हवालदार आणि मोरे पोलीस हवालदार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण भंडारे आणि वढु बुद्रुक गावचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे सर आभार प्रदर्शन विलास कुरकुटे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक ,शिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.