खडकवासला धरणावरील अधिकारी व कर्मचारी शिवसेनेतर्फे सन्मानीत

Bharari News
0
लोणीकाळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक 
        खडकवासला पाणलोट क्षेत्रातील पानशेत, वरसगाव व टेमघर हि सर्व धरणे १००% भरून त्यामधून विसर्ग सुरू आहे. जुलै महिन्यापासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तेव्हापासून हे अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून, रात्रंदिवस पाण्याचे निरीक्षण करून योग्य असे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. त्यांचा शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे सत्कार करण्यात आला,
त्यांना कायम पाणी क्षमतेपेक्षा जास्त वाढणार नाही आणि लोकवस्तीत पाणी घुसून लोकांचे नुकसान होणार नाही, जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे. कधी अतिवृष्टी होईल आणि पाणी अचानक वाढेल ते सांगता येत नाही. अशा परिस्थितीत यो.स.भंडलकर,सहाय्यक अभियंता श्रेणी- १, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांचे मार्गदर्शनानुसार  खडकवासला धरणाचे  सहाय्यक शाखा अभियंता दत्तात्रय कापसे साहेब व त्यांचे कर्मचारी हे जागरूक राहून नियंत्रण करीत आहेत. 
       अशा वातावरणात देखील त्यांनी देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस अतिशय सुंदर आणि मनमोहक विद्युत रोषणाई केली. पुणे शहर आणि परिसरातील अनेक पर्यटकांनी हि रोषणाई पाहण्यासाठी धरण परिसरात गर्दी केली होती व त्याचा आनंद घेतला.
       कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणाचे पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल व धरणावर नेत्रदिपक रोषणाई केल्याबद्दल शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे सहाय्यक शाखा अभियंता दत्तात्रय कापसे .रेखाताई मुंडे मॅडम व इतर कर्मचारी यांचा सन्मान शिवसेना उपतालुका प्रमुख संतोषदादा शेलार, उपविभाग प्रमुख अविनाश सरोदे, मा.सरपंच अंकुशनाना पायगुडे,मंदार निघोट, स्वप्निल शिंदे, विकास कांबळे यांनी केला. याप्रसंगी लोकांनी कायम दक्ष राहून सहकार्य करावे असे आवाहन दत्तात्रेय कापसे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!