सुनील भंडारे पाटील
लोणी काळभोर (ता हवेली) येथे आश्चर्यकारक घटना,पुरातन महादेव मंदिरामध्ये नागराजाने महादेवाची पिंड, व महादेव मूर्तीवर लोकांना दर्शन दिले,
देव सर्वजगात, सजीव सृष्टी, निसर्गामध्ये असल्याचा प्रत्यय आपल्याला ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे, परमरेस्वराची लीला आघात आहे, सद्यस्थितीत श्रावण महिना चालू असून गावोगावी, ग्रंथ वाचन, उपवास केले जात आहेत, देवादिकाचा महिना म्हणून श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे, भगवान शंकराचे, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी या महिन्यात लोक बारा ज्योतिर्लिंगाची देखील यात्रा करतात, पुणे जिल्ह्यामध्ये देखील श्रावणी सोमवारला, भीमाशंकर, भुलेश्वर, वाघेश्वर आणि आपापल्या गावांमधील महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात, महादेवावर भाविकांची श्रद्धा खूप आहे, अशातच अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने लोकांना आश्चर्य तर वाटतच आहे, परंतु लोकांची महादेवावरील भक्ती वाढू लागली आहे,
काल शुक्रवार ता 5 रोजी लोणी काळभोर येथील जुन्या पुरातन महादेव मंदिरामध्ये सायंकाळी साडेचार च्या सुमारास मोठ्या नागराजाने मंदिरात प्रवेश करून प्रथम महादेवाच्या गळ्यामध्ये, व नंतर पिंडीला वेडा टाकून पिंडीवर फणा काढून सुमारे एक तास दर्शन दिले, हे चित्त थरारक दृश्य पाहण्यासाठी लोणी काळभोरकरांची अलोट गर्दी लोटली होती,
नुकतेच सणसवाडी येथील नरेश्वर मंदिरामध्ये महादेवाची प्रचिती आलेल्या भाविक भक्ताने सुमारे दीड किलो चांदीचे शिवलिंग निनावे अर्पण केले होते, याच घटनेच्या दिवशी लोणी काळभोर मध्ये, नागराज यांनी असे दर्शन दिल्याने, जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात चर्चेला उधाण आले आहे,