सिंगापूर बहीरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाची सरशी

Bharari News
0
सासवड बापू मुळीक
            महाराष्ट्रात नाट्यमयरित्या झालेल्या सत्ताबदलानंतर , पुरंदर तालुक्यातील सिंगापूर व बहीरवाडी ग्रामपंचायतीच्या  सार्वत्रिक निवडणूकीत शिंदे गटाची सरशी होऊन , या  दोन्ही ग्रामपंचायतीवर माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून ,शिंदे गटाला बहुमत मिळाले असून या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे, 
सिंगापुर ग्रामपंचायत निवडणूक काॅंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती, परंतु एकत्रित निवडणूक लढवून देखील, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागा मिळवता आल्याने, सिंगापूर ग्रामपंचयात विजय शिवतारे यांच्या ताब्यात आली आहे, या विजयानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि शाखाप्रमुख विक्रांत पवार म्हणाले स्वर्गीय शंकरराव उरसळ यांच्या आशीर्वादाने , आम्हाला घवघवीत यश मिळाले आहे, यापुढे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली, 
        बहीरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली , शिंदे गटाने ७ पैकी ४ जागा जिंकत सत्ता मिळवली आहे . या दोन्ही ग्रामपंचायतीवर विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली , शिंदे गटाच्या भगवा फडकविण्यात कार्यकर्त्यांना यश प्राप्त झाले आहे,  याबाबत माजीमंत्री विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर झालेल्या निवडणूकीत शिंदे गटाला बहुमत देऊन, सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे, ,मी आमदार नसलो, तरी पुरंदर हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिवतारे यांनी सांगितले . 
           ग्रामपंचायत सिंगापूर विजयी उमेदवार
१)  विक्रांत पवार, २) सौरव लवांडे ३ ) अर्चना लवांडे ४ ) विशाल लवांडे ५ संगिता वारे , ६ ) चांगुणाबाई वाघमारे, ७ ) मिना उरसळ,
          ग्रामपंचायत बहीरवाडी विजयी उमेदवार, 
१ ) शरद पढेर , २ ) संगिता भगत ३) दशरथ जानकर, ४ ) पुजा चिव्हे, ५ ) अमोल भगत, ६ ) सुजाता भगत ७ ) स्वाती कोकरे हे उमेदवार विजयी झाले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!