सुनील भंडारे पाटील
वाघ, बिबट्या ,अस्वल, गवा ,रानडुक्कर, लांडगा ,तरस ,कोल्हा ,मगर, हत्ती, यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास अथवा पशुधन अपंग किंवा जखमी झाल्यास शासनातून आता पूर्णपणे अर्थसहाय्य होणार आहे,
2018 पर्यंत शासन निर्णय मधील तरतुदीनुसार अर्थसाह्याची रक्कम संबंधितांना अदा करण्यात येते, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल मेंढी बकरी किंवा इतर पशुधनाचा मृत अपंग जखमी झाल्यास शासनाच्या निर्णयानुसार अर्थसाह्याची रक्कम संबंधितांना अदा करण्यात येते, मनुष्यहानी मध्ये देखील शासनाकडून मदत दिली जात होती, परंतु ही मदत वाढ करण्यासंदर्भात शासन विचाराधीन होते, अर्थसहाय्य वाढीच्या मागणीनुसार राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे,
वन्य प्राण्याच्या हल्ल्याने व्यक्ति, पाळीव प्राणी मृत झाल्यास, अपंग जखमी झाल्यास आता अशा पद्धतीने राज्य शासनाची मदत मिळणार आहे
1) व्यक्ती मृत झाल्यास
रुपये 20 लाख पैकी 10 लाख तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम 10 लाख त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा
2) व्यक्ती कायम अपंग झाल्यास
रुपये 5 लाख
3) व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास
1 लाख 25 हजार
4) व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास
खाजगी रुग्णालयासाठी 20,000 मदत, प्रति व्यक्ती, शक्यतो औषधोपचार शासकीय/ जिल्हा परिषद रुग्णालयात करावा
5) गाई म्हैस बैल यांचा मृत्यू झाल्यास
बाजार भाव किमतीच्या 75 टक्के किंवा 70000 यापैकी कमी असणारी रक्कम मिळणार,
6) मेंढी बकरी व इतर पशुधन याचा मृत्यू झाल्यास
बाजार भाव किमतीच्या 75 टक्के, किंवा रुपये 15000 पैकी कमी असणारी रक्कम,
7) गाय म्हैस बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास
बाजार भाव किमतीच्या 50%, किंवा रुपये 15000 यापैकी कमी असणारी रक्कम,
8) गाय म्हैस बैल मेंढी बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास
औषधोपचार शासकीय जिल्हा पशुचिकितसंलंय रक्कम मर्यादा 25% किंवा 5000 प्रति जनावर यापैकी कमी,
वन्यप्राणी हल्ला संदर्भात राज्य शासनाने अर्थसहाय्य मदती संदर्भात अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असून तशा स्वरूपाचे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत,