वेल्हा तालुका सरपंच महासेवा संघ पदाधिका-यांचा गावभेट दौरा

Bharari News
0
शिनोली रवींद्र बोऱ्हाडे
              महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नामदार दिलीप वळसे पाटील यांचे  निरगुडसर (ता.आंबेगाव) हे विविध विकासकामे, भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा तसेच गावच्या इतर सोयी-सुविधा यांमुळे हे गाव जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल असे गौरवोद्गार आज वेल्हा तालुका सरपंच महासेवा संघाचे पदाधिका-यांनी गावभेट दौऱ्यावर असताना केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात व त्याआधी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव-शिरुर मतदारसंघात विविध विकासकामांमुळे झालेला कायापालट याचाही यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.        
यावेळी सरपंच महासेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास कडू, पुणे विभाग प्रमुख चंद्रकांत गव्हाणे, कार्याध्यक्ष वंदना गव्हाणे, जिल्हासंपर्क प्रमुख नीरज कडू, वेल्हा तालुक्यातील सरपंच हरिभाऊ चोरगे, नवनाथ जोगडे, सचिन बधे, भरत जोगडे, संतोष कोकरे, विठ्ठल कोडीतकर, तानाजी कचरे, प्रकाश भावलेकर, विकास मोरे, तानाजी जाधव, गुरुदेव राठोड उपस्थित होते.
             गावभेट दौऱ्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सुसज्ज इमारत, मैदान, स्वच्छता गृहे, क्रीडा साहित्य, संरक्षण भिंत तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गावच्या मध्यावर उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प व त्याद्वारे पुरविण्यात येणारी नळपाणी पुरवठा योजना, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात चालू असलेल्या शैक्षणिक तसेच क्रीडा विभागाचे देखील विशेष कौतुक मान्यवर पाहुण्यांकडून करण्यात आले. आयुष्यमान भारत संकल्पनेतून साकारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन तेथील प्रयोगशाळा,  औषधसाठा, शस्रक्रिया, प्रसूतिगृहाची पाहणी करण्यात आली. घोडनदी तीरावर वसलेल्या या गावातील भव्य सामाजिक सभागृह, मंदिरे, अंतर्गत रस्ते, दुतर्फा असलेली वृक्षलागवड, स्मशानभूमी व दशक्रिया घाटावरील स्वछता, वृक्षलागवड तसेच भौतिक सुविधा पाहण्यात आल्या. बेलसरवाडी येथे अगदी नगण्य पट असलेली अंगणवाडी येथे अतिशय नाविन्यपूर्ण बनवलेली परसबाग या गावभेटीतील विशेष आकर्षण होते. तेथे स्थानिक विद्यार्थी व अंगणवाडी सेविका यांनी पिकविलेल्या भाज्यांचा विद्यार्थ्यांना पोषण आहारात रोज वापर केला जातो. सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, लाखणगाव सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, मा.उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, सपनाताई हांडे देशमुख , ग्रामपंचायत सदस्य तेजल गावडे, तृप्ती टाव्हरे, जयश्री थोरात, ग्रामसेवक संपत पांढरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुजा थोरात, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता शेटे, विद्यालय प्राचार्य सुनंदा गोरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, समिर मेंगडे यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उर्मिला वळसे, उपसरपंच आनंदराव वळसे यांनी स्वागत केले. मा.उपसरपंच सपनाताई हांडे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!