सासवड बापू मुळीक
पुरंदर तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात संपूर्ण देशभर " हर घर तिरंगा ध्वज " फडकविण्यात येणार आहे. यानिमित्त जनजागृती करण्यात येत असून आज गुरुवार दि. ११ रोजी पुरंदर तालुक्यात " तिरंगा रॅलीचे " आयोजन करण्यात आले होते. यावेळी देश भक्तीपर गीते, ध्वजगीते तसेच विविध घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित पुरंदर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच सासवड पोलीस यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर कॉलेज पासून रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर पीएमटी बस स्थानक, भाजी मंडई, भैरवनाथ मंदिर, शिंपी आळी, नगरपालिका, शिवतीर्थ चौकातून सासवड जेजुरी रस्त्यावरून पुन्हा पुरंदर कॉलेज असे नियोजन करण्यात आले होते. सुमारे दोन हजार विद्यार्थी तसेच प्राध्यापक, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी हातात तिरंगा घेवून विविध घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
प्राचार्य इस्माईल सय्यद, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, सुप्रिया दुरंदे त्याच प्रमाणे विद्यालयाचे उपप्राचार्य विजय खोमणे,विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र निचळ, निलेश जगताप, राजेश राणे, रवीन जगदाळे, अजय काळभोर, राजेंद्र बढे,फैयाज मुलाणी, बालाजी परतवाड तसेच शिक्षक, विद्यार्थी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.