सुनील भंडारे पाटील
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे आता गोरगरीब जनता वैतागली असून, ऐन कोरोना काळामध्ये, लॉकडाउनच्या काळामध्ये महागाईने सर्वात उच्चांक गाठला आहे, त्यामुळे गोर गरीब जनतेने जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे,
वास्तविकता राज्यामध्ये देशांमध्ये कुठलेही सरकार निवडून देताना जनतेचा फक्त एकच प्रश्न असतो की आम्हाला सुखाने जगता आले पाहिजे, गेले शेकडो वर्षापासून महागाईचा भडका एवढा कधीच झाला नव्हता, ऐन कोरोना लॉकडाऊन काळामध्ये महागाई कित्येक पटीने वाढली आहे, आणि रोजगार, व्यवसाय यामधून येणारे उत्पन्न तब्बल दहा पटीने कमी झाली आहे, मग आता या महागाईशी सर्वसामान्य गरीब जनतेने सामना कसा करायचा, जगायचं कसं असे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकारने आता महागाई कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पेट्रोल, डिझेल, किराणामाल, गॅस, मोबाईल, टीव्ही रिचार्ज इतर जीवनावश्यक वस्तू यासाठी खूपच अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे, एकंदरीत अतिशय गरजेचे असणाऱ्या वस्तूची खरेदी व वापर, पर्याय नसल्यामुळे खर्च वाढला आहे उत्पन्न एकदम कमी झाले आहे, या अतिरिक्त खर्चांमुळे सर्वसामान्य गरीब माणसाचे कंबरडे मोडले आहे, महागाई जर अशीच वाढत राहिली तर जगायची कसे, असा प्रश्न पडला आहे,