सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
जिवनात संपती पैसा कमी मिळाली तरी चालेल पण पालकांनी मुलांना संस्कारी बनवा, असे प्रतिपादन समसवाडी येथे कै . दताभाऊ हरगुडे यांचे द्वितीय पुण्यस्मरणानिमीत केले . सणसवाडी (तालुका शिरूर) येथील शिवम मंगल कार्यालयामध्ये हरगुडे परिवारातर्फे आयोजित किर्तन व भव्य रक्तदान शिबीर प्रसंगी माजी सभापती प्रकाश पवार, मोनिका ताई हरगुडे , आनंदराव हरगुडे , मार्केट कमिटीचे माजी संचालक दताभाऊ हरगुडे, कॉग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, गिता गोरखनाना भुजबळ , गोरक्ष दरेकर ,संपत साकोरे , दिलीप महाडीक, भानुदास साकोरे , प्रकाश शिवले , शांताराम कटके , राजाभाऊ मांढरे, नवनाथ हरगुडे , बाळासो सैद , विद्याधर दरेकर , बापुराव हरगुडे, सरपंच संगिता हरगुडे , रामदास दरेकर ,दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे, खजीनदार मोहन दरेकर, सचिव मोहन हरगुडे,सप्ताह मंडळांचे उपाध्यक्ष काळुराम हरगुडे , मोहननाना हरगुडे , बबुसराव दरेकर , काकासो चव्हाण , राजाभाऊ मांढरे , रवि भुजबळ , हभप राजेंद्र गरुड , विकास जाधव , चेअरमन सुरेश हरगुडे , भानुदास दरेकर , अलाउन्सर ढोरे , ढोकले व आप्तेष्ट उपस्थीत होते . यावेळी पुणे ब्लड बॅकेस डॉ . राहुल तोळनुरे यांचे मार्गदर्शनाखाली ७० जणांनी रक्तदान केले . ज्ञानदान , अन्नदान व रक्तदान श्रेष्ठ दान आहे , असे माशेरे महाराजांनी सागितले .
चि . वेदांत, मोहननाना व हरगुडे परिवाराने कै . दताभाऊंचे प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली . हमप माशेरे महाराज व सर्व हरीपाठ मंडळ व भजनी मंडळाचे सदस्यांस मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सन्मानीत करणेत आले . शेवटी उपस्थितांना महाप्रसाद भोजनाने या पुण्यस्मरणाची सांगता झाली .