रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
वाघाळे (तालुका शिरूर) येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते व विद्युत रोषणाई करण्यात आले होती.
पहाटेच्या सुमारास श्रीकृष्ण मूर्तीला विधिवत स्नान घालण्यात आले , ध्वजारोहन करण्यात आले व त्यानंतर भगवत गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण करण्यात आले.
यानंतर सायंकाळच्या सुमारास स्वाध्याय परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले पथनाट्य सादर करण्यात आले , भजन जन्म अध्याय , जन्मसोहळा , पाळणा गायन व दांडिया नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी परमपूज्य तपस्विनी शकुंतलाताई बाळापूरकर , तपास्विनी शारदाताई बाळापूरकर , परमपूज्य धनंजय बाळापूरकर , गोवर्धन शास्त्री बाळापूरकर , मधुकर मुनी बाळापूरकर यांसह गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ , आबालवृद्ध, महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.