अनिकेत मुळीक लोणी काळभोर
**** महाराष्ट्र शासन *****
राज्यात गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे अनेक खटले दाखल झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, युवक व इतर नागरिकांना अनेक अडचणी उद्भवत आहेत, म्हणून सदर खटले मागे घेण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे मागणी होत असल्याने सदर खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यात गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे ज्या गुन्ह्यांमध्ये दि.३१/०३/२०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत व ज्या खटल्यांमध्ये खालील अटी/शर्तीची पूर्तता होत आहे असे खटले मागे घेण्याची कायदेशीर तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन तत्वत: मान्यता देत आहे.
अ) सदर खटले हे गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन __ झाल्यामुळे दाखल असावेत. ब) अशा घटनेत जिवीत हानी झालेली नसावी. क) अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे रु.५,००,०००/- (रु. पाच लक्ष) पेक्षा जास्त
नुकसान झालेले नसावे.
२. गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल झालेल्या खटल्यांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे :
आ) पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रासाठी) १) पोलीस आयुक्त
:- अध्यक्ष २) सहायक संचालक, अभियोग संचालनालय :- सदस्य ३) पोलीस उप आयुक्त (गुन्हे)
:- सदस्य-सचिव