सासवड बापू मुळीक
देशाच्या स्वातंत्र्यात आपल्या जीवाची बाजी लावून प्राणपणाने लढणाऱ्या आणि आपले बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना " क्रांती दिनानिमित्त " अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांतीकारकांच्या नावांच्या घोषणा देवून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. विविध संघटना आणि मान्यवरांनी स्वातंत्र्य योद्ध्यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून आणि पुष्पवृष्टी करून अभिवादन केले.
पुरंदर तालुक्यात क्रांतीदिनानिमित्त विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन केले. सासवडच्या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतिकारकांच्या नावांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मराठा महासंघाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गणेश मुळीक, कार्याध्यक्ष बाबुराव गायकवाड, शलील महाराज जगताप,युवाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, संजय पापळ, माजी नगरसेवक नंदकुमार जगताप, सागर जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजित जगताप, सरदार गोदाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक जगताप, प्रल्हाद कारकर, राजनभैया जगताप, संतोष जगताप, विजय जगताप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे, शशांक सावंत, प्रशांत जगताप, गौरव साळुंखे आदी उपस्थित होते.