शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील नवनिर्वाचित सदस्यांचा आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सोमनाथ भाकरे आणि मित्र परिवाराच्या कष्टाचे चीज झाल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
अनेक वर्षे संघर्ष करून सोमनाथ भाकरे या अवलियाने त्याच्या काही मित्र परिवारासह स्वतंत्र माळवाडी ग्रामपंचायतचे स्वप्न उराशी बाळगून माळवाडी ग्रामपंचायत विभक्त केली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत
ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आणि तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने राजकारणातल्या मुरब्बी आणि अनुभवी लोकांच्या समोर पॅनल उभे करून त्यांचे तगडे आव्हान स्वीकारून बहुमताने विजयश्री खेचून घेत स्वतःचा ठसा उमटविला.
या विजयाबद्दल संपूर्ण तालुक्यातून या तरुणाईवर अभिनंदनाचा वर्षाव झाला असून या नवनिर्वाचित सदस्यांची विजयी मिरवणूक रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. सोमनाथ भाकरे यांचे जुने सहकारी व मार्गदर्शक टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामूआण्णा घोडे यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान केला.यावेळी टाकळी हाजीचे नवनिर्वाचित सदस्य गोविंद गावडे , विलास साबळे, बाबाजी साबळे , मुंबई हायकोर्टाचे वकील सिराज शेख व माळवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.