दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी शिरूर पोलीसांनी केली गजाआड

Bharari News
0
गुनाट  एकनाथ थोरात
        मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील नांद्रेमळा भागात रविवार दि .३१ रोजी रात्रौ ११.०० वा . मा . पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रा . यांचे आदेशान्वये पुणे ग्रामीण जिल्हा मध्ये ऑलाऊट ऑपरेशन नेमण्यात आले होते . त्या नुसार पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शिरूर पोलीस ठाणे हददीत ऑलाऊट ऑपरेशन करीता वेगवेगळे पथक तयार करून रात्रगस्त सक्त करणेबाबत अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या .     
रात्रगस्त दरम्यान  ता . ०१/०८/२२ रोजी पहाटे ०४.३० वा . चे सुमारास  नांद्रेमळा येथील कानिफनाथ भिंतीच्या आडोशाला पाच इसम संशयास्पद रित्या उभे असलेले पोलीस पथकास दिसल्याने मंदीराचे पोलीस पथकानी तेथे अचानक छापा टाकला असता चार जण मिळुन आले व एक जण  आंधाराचा फायदा घेउन पळून गेला आहे . ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे १ ) किसन रामा लोंखडे वय २२ वर्षे रा . आरोळे हॉस्पीटल शेजारी , जामखेड ता . जामखेड जि . अ . नगर २ ) अशोक उर्फ सोनु बबन जाधव वय २३ वर्षे रा . सदर ३ ) रुषीकेश बाळासो गरडकर वय २३ वर्षे रा . सदर ४ ) रवि रमेश नाईक वय २० वर्षे रा . पिंपळगाव ता . दौंड जि . पुणे असे असुन पळुन गेलेल्या व्यक्तीचे नाव ५ ) पंकज उदास काळे रा . खोरोडी ता . दौंड जि . पुणे असे आहे, त्यांच्या ताब्यातुन पोलीसांनी १ ) एक खाकी रंगाची बुलेट विना नंबर प्लेटची तीचा चॅसी नं . ME3U3S5C2KG596655 अशी २ ) एक लोंखडी पहार ३ ) एक कुहाड ४ ) एक स्प्रे पेंन्ट ५ ) दोन मिरची पावडरच्या पुडया ६ ) एक रस्सी ७ ) एक पोको कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १,५१,००० / -रु.चा माल जप्त केला आहे . त्यांना पोलीसांनी तेथे थांबण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधानकारक माहीती देत नव्हते व उडवा उडवीची उत्तरे देत होते . त्यांचेकडे मिळुन आलेल्या हत्यारे व साधनावरून सदरचे व्यक्ती हे कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची खात्री झाली असल्याने त्याबाबत योगेश आंनदा गुंड पोलीस शिपाई ब.नं. २८८८ नेमणुक शिरूर पोलीस ठाणे जि . पुणे ग्रामीण यांनी दिले तक्रारी वरून शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ५४५/२२ भा.द.वि.क. ३ ९९ , ४०२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे . ताब्यात घेण्यात आलेले इसम क्र . १ ते ४ यांना अटक करून शिरूर कोर्टात दाखल केले असता त्यांना ता . ०३/०८/२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी (रिमांड) मंजुर करण्यात आलेली आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत असुन पोलीस तपासामध्ये खालील गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत . १ ) आरोपीत यांचे कडे मिळुन आलेली एक खाकी रंगाची बुलेट विना नंबर प्लेटची तीचा चॅसी नं . ME3U3S5C2KG596655 ही त्यांनी कासुर्डी टोलनाका येथुन चोरलेली आहे . २ ) आरोपीत यांनी काल रात्री ता . ०१/०८/२२ रोजी राहु ता . दौंड जि . पुणे येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे . ३ ) यातील आरोपीत रवि रमेश नाईक हा यवत पोलीस ठाणे येथील सन २०२१ मधील एटीएम फोडीच्या गुन्हयामधुन आज पर्यंत फरारी होता . आरोपीत यांनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता असुन त्या दृष्टीने शिरूर पोलीस त्यांचे कडे तपास करीत आहेत . ही कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख  , मा . अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे , पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी शिरूर यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , शिरूर पोलीस ठाणे , सपोनि अमोल पन्हाळकर , सहा . फौजदार राजेंद्र साबळे , पोना नितीन सुद्रिक , पोकॉ . योगेश गुंड , होमगार्ड सुहास आडगळे , राहुल चौगुले , पोलीस मित्र अक्षय काळे या पथकाने केलेली आहे .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!