मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला, ढोल ताशाच्या तालावर धरला ठेका - पहा व्हिडिओ

Bharari News
0
शिनोली प्रतिनिधी - रवींद्र बोऱ्हाडे   
       मंचर (तालुका आंबेगाव) ज्यासाठी अट्टहास केला नेमके त्याच्याच उलटे घडावे, अशी परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यात झाली.  राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...
      राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या त्रासाला कंटाळून शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गेले. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले.     
मुख्यमंत्री हे भीमाशंकरच्या दर्शनाला येण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्याही निवासस्थानी भेट द्यावी, अशी विनंती आढळरावांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य देखील केली. पण आढळरावांच्या घरी जाण्याच्या आधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी भेटले आणि तेथेच चर्चा सुरू झाली. राजकीय पटलावर या भेटीचे पडसाद उमटले नाही तरच
क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन घेऊन मुख्यमंत्री सायंकाळी मंचर येथे आले . जाण्यापूर्वी ते लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या बंगल्यावर जाणार होते. तेथे ते भोजनही करणार असल्याची माहिती आढळराव पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली होती. त्यामुळे सर्व पत्रकार लांडेवाडी येथेच होते. पण अचानकपणे दौऱ्यात बदल झाला आणि मुख्यमंत्री हे थेट वळसे पाटील यांचे निवासस्थानी आले. नंतर त्यांनी वळसे पाटील यांच्या समवेत अल्पोपहार घेतला. पण नेमकी आत काय चर्चा झाली याविषयी मात्र माहिती उपलब्ध झाली नाही. दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांची धावती भेट घेतली,
मंचर शहरात फटाक्याची आतषबाजी करत शिंदे गट शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत  करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
ढोल ताशाच्या तालावर चांगलाच ठेका धरला, त्यांनी मनसोक्त डान्सचा आनंद घेतला, शिंदेंच्या बरोबर अनेकांनी ढोल ताशाच्या तालावर  तालावर डान्स केला, यावेळी खूपच गर्दी झाली होती, आंबेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार शिवाजी दादा आढळराव, दिलीप वळसे पाटील हे राजकीय वर्तुळातील गणित लोकांना उलगडेना, सध्या चर्चेला खूप उदान आले आहे,   
       याप्रसंगी भाजपच्या नेत्या आशा बुचके, संजय थोरात, विजय पवार, जयसिंग एरंडे, शिवसेनेचे अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह हजारो कार्यकर्ते रस्त्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मुख्यमंत्र्यासोबत त्यांच्या पत्नी आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!