शिवसेना(शिंदे गट) हवेली तालुकाध्यक्ष पदी विपुल शितोळे यांची निवड;हवेलीतील शिवसेना(ठाकरे) गटाला धक्का....
माजी खासदार आढळरावं यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान
सुनील भंडारे पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने,शिवसेना(शिंदे गट) हवेली तालुकाध्यक्ष पदी विपुल हनुमंत शितोळे यांची निवड आज लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे माजी उपनेते शिवाजीराव आढळरावं पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करून करण्यात आली.याप्रसंगी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे,उपसभापती राजेश जवळेकर,अरुण गिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ही निवड करण्यात आली असून शितोळे यांच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने हवेली तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद व वर्चस्व वाढले आहे.विपुल शितोळे न्हावी सांड्स गावचे गेले १० वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तर हे वीज नियंत्रण समितीचे सदस्य असून हवेली तालुक्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळरावं पाटील यांचे निष्ठावंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
समाजकारण व राजकारणात सुरुवातीपासून विपुल शितोळे हे शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत.याआधी युवा सेनेचे हवेली तालुका व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी होते.शितोळे यांचे वाडेबोल्हाई-पेरने व लोणीकंद जिल्हा परिषद गटासह हवेली तालुक्यात उत्तम काम व नवलौकिक असून त्यांचा मित्रपरिवाराचा चांगला गट कार्यरत आहे.शितोळे हे सुरुवातीपासून माजी खासदार आढळरावं पाटील यांचे निष्ठावंत समर्थक असल्याने ते शिवसेना शिंदे गटात नव्याने सामील होत ते नवे हवेली तालुकाध्यक्ष पदावर विराजमान झाले.शितोळे शिंदे गटात गेल्याने,तालुक्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला हवेली तालुक्यात धक्का बसला आहे.