सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षे वय पूर्ण झालेल्या जेष्ठ
नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, आता राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी
कुठेही प्रवास करा, तिकीट लागणार नाही,
राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय
घेण्यात आला आहे, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, ज्येष्ठ
नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ
बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना, महाराष्ट्र मार्ग
परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये ही सवलत देण्यासाठी
शासनाची मान्यता देण्यात आली आहे,
1) महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवास,
2)
महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% प्रवास सवलत,