*लोणीकंद ग्रामपंचायतीच्या प्रथम ओबीसी महिला सरपंचपदी सुलोचना दत्तात्रय झुरुंगे,उपसरपंचपदी नंदकुमार कंद बिनविरोध*
*-[प्रदिपदादांच्या नेतृत्वाखाली लोणीकंदने बिनविरोध निवडीची परंपरा राखली]-*
सुनील भंडारे पाटील
हवेलीतील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोणीकंदच्या इतिहासात ग्रामपंचायतीच्या प्रथम ओबीसी महिला सरपंचपदी सुलोचना दत्तात्रय झुरुंगे यांची व उपसरपंच पदी नंदकुमार काळूराम कंद यांच्या जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष तथा पीडिसीसीचे संचालक प्रदिपदादा कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड पार पडली.
लोणीकंद ग्रामपंचायतीवर जि.प.चे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसीचे संचालक प्रदीपदादा कंद,माजी सभापती नारायणराव कंद,जि.प.चे माजी सदस्य शंकर काका भूमकर,भाजपचे तालुकाध्यक्ष पै.संदिप भोंडवे,माजी सरपंच दिपक कंद,माजी सरपंच श्रीकांत कंद,माजी सरपंच अनिल होले,तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय कंद यांच्या नेतृत्वाखालील श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आज लोणीकंद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी विस्तार अधिकारी नवनाथ कारंडे,ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे,तलाठी गणेश सासणे यांच्या अधिकाराखाली पार पडली.यामध्ये सरपंच पदासाठी सुलोचना दत्तात्रय झुरुंगे व उपसरपंच पदासाठी नंदकुमार कंद यांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
याप्रसंगी लोणीकंद ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर कंद,राहुल शिंदे,कावेरी सुनील कंद,प्रियंका योगेश झुरुंगे,अतुल मगर,मोनिका श्रीकांत कंद,आशिष गायकवाड,सुजाता अमृत कंद,दिपाली महेश राऊत,सोनाली गणेश जगताप,सागर कंद,सुप्रिया जय कंद,गौरव झुरूंगे,ओंकार कंद,सरस्वती गंगाधर दळवी तसेच सदाशिव झुरुंगे,माजी उपसरपंच रविंद्र कंद,गजानन कंद,रविंद्र कंद,योगेश झुरुंगे,जनार्दन वाळुंज,रघुनाथ तापकीर,रघुनाथ कंद,गुलाबराव कंद,गंगाधर दळवी,भाऊसाहेब झुरुंगे,दत्तात्रय झुरुंगे,सोपानराव कंद,ज्ञानेश्वर कंद,दत्तात्रय जगताप,जय कंद,किरण होले,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निवड झाल्याबद्दल ग्रामदैवत श्री म्हसोबा देवस्थानचे दर्शन घेत,फटाक्यांची आतषबाजीत,गुलालाची,भांडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.लोणीकंदने सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीची परंपरा यावेळीही राखली.तर प्रथम ओबीसी महिला सरपंच होण्याचा मान नवनिर्वाचित सरपंच सुलोचना दत्तात्रय झुरुंगे यांना मिळाला.