शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर ( तालुका शिरूर ) येथे ग्रामापंचायत कार्यालयात पीएम किसान केवायसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
शेतकरी कृषि सन्मान योजनेला ३१ ऑगस्ट पूर्वी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना वार्षिक मिळणारे सहा हजार रुपये बंद होतील म्हणून ह्या कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी शिक्रापुरचे सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, मंडळ कृषि अधिकारी अशोक जाधव यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. शिक्रापूर-राऊतवाडी येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावे व १० टक्के व १०० टक्के तपासणी यादीत नावे असलेले शेतकऱ्यांनी कृषि मित्र तानाजी राऊत यांच्याकडे आपले ७/१२, ८ अ, आधार, बँक पासबुक व फॉर्म भरून द्यावे जेणेकरून शेतकरी ह्या योजनेतून वंचित रहाणार नाही असे आहवान मंडळ कृषि अधिकारी अशोक जाधव यांनी केले.
पीएम किसान केवायसी सोबतच मतदान कार्डला आधार लिंक देखील करण्यात आले. या योजनेला शेतकऱ्यानी चांगला प्रतिसाद दिला व आपापले केवायसी करून घेतले. या कामासाठी शिक्रापूर गावातील महा ई सेवा केंद्राचे प्रमुख मोहन भुजबळ, पप्पू गुरव, एएसएन महा ई सेवा यांनी मोफत सेवा पुरवली. शिक्रापूरचे बी एल ओ संजय गायकवाड, शरद दौंडकर यांनी मतदान कार्डला आधार लिंक करण्यासाठी मदत केली. जे शेतकरी उपस्थित राहू शकले नाही त्यांनी ३१ ऑगस्ट पूर्वी महा ई सेवा केंद्रावर जाऊन केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पिसाळ व तालुका कृषि अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे. या कॅम्पचे आयोजन शिक्रापूर गावचे गावकामगार तलाठी सुशीला गायकवाड, कृषि सहाय्यक अशोक जाधव यानी केले. ह्या कॅम्पला समता परिषदचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृषिमित्र तानाजी राऊत, कृषि पर्यवेक्षक सुनील मोरे, प्रगतशील शेतकरी अंकुश हिरवे, महादेव गायकवाड, कैलास मांढरे व शिक्रापूर राऊतवाडीचे अनेक शेतकरी उपस्थित होते.