सुनील भंडारे पाटील
पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथील ग्रामपंचायत मध्ये सेवेत असणारा ग्रामसेवकाने नवीन घराच्या बांधकामाची सरकारी नोंदीसाठी लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने हवेली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी कारवाई करत संबंधित ग्रामसेवकाला निलंबित चे आदेश काढले,
राजेंद्र शिंदे असे पिंपरी सांडस येथील निलंबित झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे, याबाबतीत रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल यांनी पुराव्यासह लेखी तक्रार गटविकास अधिकारी हवेली पंचायत समिती यांच्याकडे दाखल केली होती, नवीन घराच्या बांधकामाची नोंद करण्यासाठी संबंधित शिंदे या ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कडून आकारण्यात येणारे शुल्क घर मालकाकडून गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यावर स्वीकारली होती, या ग्रामसेवकाची सखोल चौकशी केल्यानंतर गावातील गट क्रमांक 356 मधील मिळकत क्रमांक
0 40 49 0 10 58 , चे करवसुलीसाठी 15000/- स्वतःच्या खाजगी गुगल पे अकाउंट वर घेऊन आर्थिक गैरव्यवहार केला आहे, तसेच या चौकशीकामी जबाब न देणे, ग्रामपंचायत नमुना नंबर 5 व 6 हे रेकॉर्ड उपलब्ध करून न देणे , कर्तव्यात कसूर करणे, कायद्याचा भंग करणे, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने ग्रामसेवक राजेंद्र शिंदे यांना जिल्हा परिषद सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, ग्रामसेवकाला निलंबित काळात दुसरी कोणतीही नोकरी अगर व्यवसाय करता येणार नाही, तसे केल्याचे निदर्शनास आल्यास, ते कृत्य गैरसिस्तीचे समजण्यात येईल, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे आदेश, गट विकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती पुणे जिल्हा परिषद, यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत,