आंबेगाव प्रमिला टेमगिरे
थोरांदळे (तालुका आंबेगाव) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाचे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांकडून स्वागत केले,
स्वातंत्र्यदासदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमिताने थोरांदळे गावात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थां वर ध्वजारोहन करण्यात आले .
त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , ग्रामपंचायत कार्यालय , अंगणवाडी , दूध डेअरी , रेशनिंग दुकान , दुकाने व ग्रामस्थांनी घरोघरी ध्वजारोहन केले.यावेळी पंचायत समितीचे माननीय रंगनाथ हूजरे ( प्रशासक ), ग्रामसेवक नवनाथ नीचित, ग्रामपंचायत कर्मचारी विजय टेमगिरे,कुंदन घायतडके, अविनाश शिंदे , माजी सरपंच सीताराम गुंड , सदस्य विकास मिंडे, अंगणवाडी सेविका पुष्पा घायतडके, आशा वर्कर्स दिपाली करंडे, मनीषा करंडे, व महिला प्रतिनिधी प्रमिला ताई उपस्थित होत्या . सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी,ग्रामस्थांनी यावेळी सन्मानपूर्वक धव्याजारोहन केले.