देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली त्यानिमित्ताने शुक्रवार दिनांक १२.०८.२०२२ रोजी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू येथे वृक्ष दिंडी व विविध विषयावर चर्चा करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती,
सदर सभा व दिंडी साठी १५५ हून अधिक पालक व माता, भगिनी , संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब भंडारे , उपाध्यक्ष महिपती शिवले, माजी अध्यक्ष साहेबराव भंडारे , लक्ष्मणराव भंडारे , माजी खजिनदार राजेंद्र आहेर व किसनआप्पा भंडारे , संभाजीराव तांबे वढू गावचे सरपंच अंकुशराव शिवले , गोरक्ष भंडारे ,सोसायटी संचालक संपत भंडारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर , ज्येष्ठ शिक्षक कुरकुटे सर , सोमनाथ भंडारे सर , कदम सर , सोनावणे सर , शिवले सर, वणवे सर , भामरे सर , आग्रे सर , सूर्यवंशी सर , येडे सर , शरद भंडारे सर , साळुंखे मॅडम, काकडे मॅडम , मोकाशी मॅडम , कंद मॅडम तसेच शिक्षकेतर स्टाफ शंकर भंडारे , विजय पांडे , भाऊसाहेब दरेकर व सत्यवान गोसावी हे उपस्थित होते,
सदर सभेत शैक्षणिक गुणवत्ता, शालेय शिस्त , विविध शिष्यवृत्ती बाबत तयारी चर्चा , पोक्सो कायदा ,परिवहन समितीची गरज ,इत्यादी बाबींवर शिक्षक संस्थाचालक वा पालक यांच्यात साधक बाधक चर्चा झाल्यावर उपस्थित सर्वांच्या सहकार्याने ,विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपरिक व वारकरी वेषात टाळ मृदंगाच्या निनादात फुलांनी सजविलेल्या पालखीत वृक्ष दिंडी काढण्यात आली, वृक्षदिंडी संपूर्ण गावांमधून फिरवण्यात आली, अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात, देशभक्ती, स्वातंत्र्य दिन घोषणा देण्यात आली, पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, सदर कार्यक्रमास करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वासराव सोनावणे यांनीही भेट दिली,