आमदार पवार यांच्या वाढदिवसा निमीत्त शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याखान

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
       पाण्याचा थेंबही दगडावर सतत टिपकत राहिला तर त्या कठीण पाषाणालाही खड्डा पडतो , तसे ध्येयात ,कोणत्याही कामगिरीत सातत्य हेच शिवरायांचे यशाचे गमक होय , कारण ५० वर्षाचे   कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी एकही दिवस  आराम घेतला नाही म्हणून हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारलं, असे विचार तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर )येथील गिताई विष्णु मंगल कार्यालयात आमदार अशोक पवार यांचे वाढदिवसानिमीत आयोजीत व्याखानात नितीन बानगुडे पाटील यांनी मांडले, वाद्यांचे गजरात नितीन बानगुडे पाटील व आमदार पवार यांचे स्वागत होऊन शिवप्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली . यावेळी मार्केट कमीटीचे सभापती काकासो कोरेकर , माजी अध्यक्ष प्रकाश पवार , आरती भुजबळ ,समता परीषदेचे विभाग अध्यक्ष सोमनाथ भुजबळ , आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे , माजी अध्यक्ष बाळासो नरके , पोपट भुजबळ , सोपान गवारे, आयोजक राहूल कर्पे, गणेश तोडकर , भुजबळ व सहकारी आणी शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थीत होते .
अठरा पगडजातीचे मावळे मातीसाठी भरायला तयार होते , राजासाठी नव्ह तर राज्यासाठी लढले व अन्याय मोगल राजवटीविरुद्ध स्वराज्य उभारलं , असे बानगुडे पाटलांनी तासभर शिवचरीत्रावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले . विशाल पुष्पहार मान्यवरांना घालत केक कापून आ . अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा करणेत आला . माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी पवार यांचे कामाचे कौतुक करत आम्ही १४ सहकारी मित्रांनी त्यातून उतराई होणेसाठी व्याखानचे आयोजन केलेचे सांगीतले . अशोक पवार यांनी समाजाची कामे करत जनतेच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!