शिरूर जयदीप लंघे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून, मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकऊ द्या ,याच्या अनुषंगाने शिक्षकांचे विविध प्रश्न ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने तहसीलदार शिरूर ,गटविकास अधिकारी शिरूर, यांना न्याय हक्काच्या मागण्या यांचे निवेदन देऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही मागणी केली..
.याप्रसंगी विभागीय अध्यक्ष शरद निंबाळकर ,जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण ,जिल्हा कोषाध्यक्ष मानसिंग वाकडे, तालुका समितीचे अध्यक्ष शरद धोत्रे , मा.अध्यक्ष सतीश नागवडे सर,एकल जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेशे सर ,जिल्हा नेते बाबा पवार , संपर्कप्रमुख संपतराव कांदळकर ,सरचिटणीस अनिल जगदाळे, माजी चेअरमन बाळासाहेब असवले ,शिक्षक नेते रमेश देशमुख ,माजी चेअरमन सखाराम फराटे ,शिक्षक नेते सर्जेराव फापाळे ,नूतन संचालक विश्वास साकोरे ,कार्याध्यक्ष किरण खैरे ,इत्यादी शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .