रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
शिक्रापूर-मलठण रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली असून या रस्त्याचे काम किती चांगल्या पद्धतीने झाले आहे हे केवळ पाऊसामुळे सिद्ध झाले आहे. असे म्हणायची वेळ आली आहे
शिक्रापुर-मलठण हा रस्ता दिवसेंदिवस अतिशय वर्दळीचा होत चालला आहे. या रस्त्यावरुन रोज हजारो छोटी मोठी वाहने वाहत आहेत. माञ सरकारी यंञणेच्या व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वर्षभरात दुरावस्था झाली आहे.
या रस्त्यावरुन प्रवाशी वाहतूकी बरोबरच अवजड वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. या रस्त्यावरुन ऊस वाहतुक , खडी , डांबर वाहतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. माञ त्या सर्व बाबींचा विचार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची गुणवत्ता ठेवण्यास ठेकेदाराला भाग पाडले असते तर आज रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली नसती या रस्त्यावरुन कामाला ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना या खराब रस्त्यामुळे व रस्त्यावर सांडलेल्या खडीमुळे अपघाताला सामोरे जावे लागत असुन या रस्त्याची लवकरात-लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाघाळे , गणेगाव खालसा , बुरुंजवाडी येथील ग्रामस्थ करीत आहेत.