शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा अभियानांतर्गत प्रत्येक जण आपल्या घरावर झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना निसर्गाने या उपक्रमाचे स्वागत करत आकाशात इंद्रधनुष्याच्या माध्यमातून या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
आज शनिवार (दि. १३ ऑगस्ट) रोजी हर घर झेंडा अभियानांतर्गत सर्वजण आपापल्या घरावरती तिरंगा झेंडा लावत असतानाच तळेगाव ढमढेरे येथे निसर्गामध्ये इंद्रधनुष्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. योगायोगाने निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल. तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे यांनी हे विलोभनीय दृष्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.