आंबेगाव. प्रमिला टेमगिरे
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणारे सर्व भाविकांना प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येते की,सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे श्री.क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.त्याबाबत प्रशासनाकडून खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
घोडेगाव ते भीमाशंकर रोडवर शिनोली गावाजवळ रस्त्यावरील पूल खचला असून तेथे प्रशासनाचे वतीने तातडीने दुरुस्तीचे काम चालू आहे याबाबत कोणीही अफवा पसरवु नयेत. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे परंतु मोठ्या प्रमाणावर भीमाशंकर कडे येणारी वाहने सुट्टीच्या दिवशी आल्यास त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते म्हणून जड वाहने व भीमाशंकर कडे जाणारे भाविक यांनी खेड तालुक्यातील वाडा रोड मार्गे भीमाशंकर कडे यावे.भीमाशंकर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अंदाजे 4000 वाहने पार्किंग केली जाऊ शकतील एवढीच वाहन क्षमता जागा उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त भाविक वाहने घेऊन आल्यास त्यामुळेही वाहतूक कोंडी होते .यामुळे ग्रुपने येणाऱ्या भाविकांनी कृपया सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा तसेच ट्रॅव्हलर किंवा मिनीबस करून आल्यास सोयीस्कर होईल.
भीमाशंकर परिसरामध्ये सायंकाळी चार वाजल्यानंतर पाऊस व धुके यामुळे दृश्यता मान कमी होते तरी सायंकाळी चार नंतर येणाऱ्या भाविकांनी त्यांच्या वाहनाला फॉग लॅम्प बसवावेत. कारण रात्रीच्या अंधारात धुक्यामुळे छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे उशिरा आल्यामुळे पार्किंग मध्ये लावलेले वाहन शोधण्यासाठी अडचण निर्माण होते.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःचे वाहन सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी रस्त्यामध्ये आपले वाहन खराब झाल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वांना सहन करावा लागतो व अमूल्य वेळ वाया जातो.
विशेषतः इलेक्ट्रिक कार व सीएनजी वरील वाहने यांनी खात्री करावी
प्रशासनाने नेमून दिलेल्या पार्किंग मध्ये आपली वाहने पार्क करायची आहेत अपरिहार्य कारणामुळे आपली वाहने मंदिरापर्यंत सोडणे शक्य होत नाही .त्यामुळे कृपया बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांबरोबर वाद घालून आपला व प्रशासनाचा वेळ वाया घालवू नये.
येणारा श्रावणी सोमवार हा तिसरा सोमवार असून यावेळी शनिवार, रविवार,सोमवार आणि मंगळवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक भीमाशंकर या ठिकाणी येत असतात. प्रशासनाकडून भाविकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सर्व भाविकांनी आपले गाडीमुळे व वर्तनामुळे पवित्र तीर्थक्षेत्राचे ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, व वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी.असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.