सुनील भंडारे पाटील
साबळेवाडी (ता खेड ) येथील महत्त्वाच्या शिक्रापूर चाकण महामार्गावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत, लहान व मोठ्या वाहतूक गाड्यांबरोबर दुचाकी प्रवाशांना करावी लागत आहे कसरत,
संबंधित ठिकाणच्या मार्गावर साबळेवाडी नजीक एक लहान घाट असून तीव्र स्वरूपाची वळणे, यामुळे आत्तापर्यंत लहान अपघात वगळता कित्येक मोठे अपघात झाले आहेत, शिवाय पुणे बॉम्बे महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून,शेतमालवाहतूक , प्रवासी वाहतूक, औद्योगिक वाहतूक, यांची सतत दाट वर्दळ असणाऱ्या या मार्गाचे महत्त्व खूप आहे, परंतु अपघात प्रवण भागात नेमके साबळे वाडी या ठिकाणी, महामार्गावर गुडघ्या एवढे खड्डे तयार झाले आहेत, त्यामुळे वाहतुकीत अडथळा येऊन लहान मोठे अपघात होत आहेत, खड्डे वाचवण्याच्या भानात चालक नागमोडी वळणे घेत आहेत, या महत्त्वाच्या रस्त्याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करत असून, संबंधित खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी होत आहे,