थेऊर प्रवीण शेंडगे
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गाची सुधारणा करणे करीता लोणीकंद ते थेऊरगाव कॉक्रीट रस्त्याचे काम करणे करीता दि. ०७/०८/२०२२ ते दि.३०/०८/२०२२ रोजी पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत व नमुद कालावधीत दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहील असे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी कळविले आहे.
पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे गरजेचे आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ /सीआर- ३७ / टीआरए२. दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी). ११६ (४) आणि ११७ अन्वये राहुल श्रीरामे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर, यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) खेरीज करून खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
लोणीकंद / लोणीकाळभोर वाहतुक विभाग पुणे अंतर्गत,
दि. ०७/०८/२०२२ ते दि.३०/०८/२०२२ रोजी पर्यंत थेऊर फाटा, नगर रोड ते थेऊर फाटा सोलापुर रोड या दरम्यान जड वाहनांचे वाहतूकीस बंदी करण्यास येत आहे..
पर्यायी मार्ग :
१. खराडी बायपास ते हडपसर
२. वाघोली- केसनंद-वाडेबोलाई पारगाव-केडगाव चौफुला- पुणे सोलापुर महामार्ग