शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील राहत्या घरातून अज्ञात चोरट्यानी सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप लंपास केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कमलेश थनवार निसाद (वय २५ वर्ष, रा.ओम हाँस्पीटलचे वर, पाबळ चौक. शिक्रापुर ता शिरुर जि पुणे, मुळ रा.कुम्ही, राजनांदगाव, पडादाह, छत्तीसगड) यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास फिर्यादी कमलेश निसाद याच्या पाबळ चौक शिक्रापूर येथील भाड्याने राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडा असताना एक सिल्वर रंगाचा असर एस्पायर कंपनीचा लॅपटॉप अज्ञात व्यक्तीने रुममध्ये येवुन चोरुन नेला आहे. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मारकड पुढील तपास करत आहेत.