वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात शाळांची उभारणी होणे गरजेचे : राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात शाळांची उभारणी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केले.     
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी शिरूर तालुक्यातील आदर्श शाळा वाबळेवाडीस भेट दिली. यावेळी त्यांनी  शाळेत  चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीबाबत समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे याप्रसंगी त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर वक्तृत्व आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी जिल्हास्तरावर निवड झालेल्या सिद्धी माळी व मधुरा काळे या विद्यार्थिनींनी याप्रसंगी सादरीकरण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीमध्ये मिळवलेल्या सलग विक्रमी यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले. शालेय परिसर, पर्यावरणस्नेही इमारत व नवीन इमारत यांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शिरूरचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुणे येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय वाडेकर, पंचायत समिती शिरूरचे विषयतज्ञ देवकाते, गावडे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ, सचिन बेंडभर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सदस्य प्रकाश वाबळे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!