लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक दि.३०/०८/२०२२लोणी काळभोर तालुका हवेली जेव्हा रक्षक बनतात लोभा साठी भक्षक होत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र वारंटमध्ये अटक न करण्यासाठी लोणी-काळभोर पोलीस स्टेशन पोलीस हवालदाराने तक्रारदारा कडे पाच हजार रुपयाची मागणी केली यावर २००० रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात अडकले.
लोणी-काळभोर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले मुकुंद शंकर रणमोडे (वय ४९. लोणी काळभोर, पोलीस स्टेशन, पुणे शहर) याने तक्रारदारावर बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंट मध्ये अटक करु नये यासाठी ५०००/- रुपयाची लाच मागितली यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली.
त्यामुळे एरवी शांत असणार्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वातावरण तप्त झाले आहे.त्यावर पडताळणी करण्यात आल्यानंतर लोणी-काळभोर पोलीस स्टेशन समोर २०००/- लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुकुंद रणमोडे व खाजगी इसम गजेंद्र माणिक थोरात (वय ३५ वर्षे, निलंबित होमगार्ड) यांना अटक केली. व गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयमाला पवार यांनी केली.