मित्राने चं मित्राला संपवले...!

Bharari News
0
अनिकेत मुळीक लोणी काळभोर
         दि.३१,लोणी काळभोर /कदमवाक वस्ती हद्दी तील घोरपडे वस्ती येथे. मित्रा मित्रा मधील  किरकोळ वाद हा मृत्यु लाच शेवट घेऊन संपला....!
       मैत्रीचा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे.आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले मित्र! पण हेच मित्र बंधन ,व्यसन,पैसे, छोटे - मोठे वादच  मृत्युला कारणीभूत ठरतात.
         अब्दुल हमीद शमशुद्दिन शेख (वय ३५,  घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मागर पाटोळे व सागर गुडेकर असे खून करणाऱ्या दोघां आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. हि घटना मंगळवार दि.३०रोजी सायंकाळी ७ वाजण्याचा सुमारास घडली आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी उल्फत अब्दुल हमीद शेख  वय ३२,रा.कदमवाक वस्ती, सदर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्फत व अब्दुल हमीद गेली १५ वर्षापासून कुटुंबासहित कदमवाकवस्ती येथील घोरपडेवस्ती परिसरात राहतात. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमाराम उल्फत या घरकाम संपवून घरी आले होते. ७ वाजण्याच्या सुमारास अब्दुलच्या मित्राने मोबाईलवर सांगितले की, तुमच्या पतीला इंदिरानगर चौकात पाण्याच्या टाकीजवळ मागर गुडेकर व सागर पाटोळे हे मारहाण करीत आहेत. तिघांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून तुमच्या पतीला लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्फत यांनी सदर ठिकाणी जाऊन बघितले असता. अब्दुल हमीद शेख हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले व डोक्याला पट्टी बांधलेली दिसून आली. सदर ठिकाणच्या दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने ससून ठिकाणी पुढील उपचाराकरिता घेऊन गेले असता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार भोसले, अजिंक्य जोजारे यांनी पाहणी केली व. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!