शिरूर तालुका विशेष प्रतिनिधी
दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत हॉटेल रानवारा येथे हॉटेल कामगार महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे वय ४५ वर्ष, रा. दावतपुर, ता. औसा, जि.लातुर यास दुसरा हॉटेल कामगार अनंता रघुनाथ कांबळे रा. कोळंबे, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी याने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने त्याचे डोक्यात पायावर व गुप्तांगावर वार करून कृरपणे खुन केल्याची घटना घडली होती.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५६ / २०२२ भा.दं.वि.क. ३०२ प्रमाणे दि. ०८/०८ / २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी अनंता रघुनाथ कांबळे रा. कोळंबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी याने अतिशय क्रूरपने खुन करून तो घटनास्थळावरून कोणास काहीएक न सांगता गुन्हयात वापरलेले हत्यार घेवुन पळुन गेला होता.. त्यामुळे त्यास लवकरात लवकर अटक करणे पोलीसांपुढे आव्हानात्मक होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ टाकळी हाजी चौकीकडील अधिकारी व डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचे मुळ गावी रत्नागिरी तसेच पुणे शहर व आजुबाजुचे परिसरात त्याचा गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक पध्दतीने शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर पो.नि. सुरेशकुमार राऊत यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील आरोपी अनंता रघुनाथ कांबळे हा विरार, जि.ठाणे या परिसरात लपुन बसलेला आहे.
त्या अनुशंगाने डी.बी. पथकाकडील पोलिस उप निरीक्षक अभिजीत पवार तसेच पोलीस अंमलदार प्रविण पिठले यांना बातमीचे अनुशंगाने तात्काळ विरार, ठाणे येथे रवाना करण्यात आले. त्या अनुशंगाने विरार, ठाणे येथे आरोपीचा विरार रेल्वे स्टेशन येथे ५ तास आरोपीचा मागोवा घेवुन त्याचा शोध घेऊन आरोपी मिळुन आल्याने त्यास पोलिस उप निरीक्षक अभिजीत पवार तसेच पोलीस अंमलदार प्रविण पिठले यांनी शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घटटे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग यशवंत गवारी, पो.नि.सुरेशकुमार राऊत शिरूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पन्हाळकर, डी.बी. पथक प्रमुख पोउपनि अभिजीत पवार, सहा फौज नाजिम पठाण, पो.ना.धनंजय थेऊरकर, पो.ना.नाथसाहेब जगताप, पो. अं. प्रविण पिठले, पो.अं.विशाल पालवे, पो.अ.संतोष साळुंके, पो.अं.दिपक पवार, पो.अं. सुरेश नागलोत, पोलीस मित्र दिपक बढे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अमोल पन्हाळकर हे करीत असून अटक आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.