सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
माणसाने जिवनात दिनभर प्रपंच करतांना क्षणभर परमार्थ वा नामस्मरण करा असे विचार पश्चीम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक शैलेश काळे सर यानी उपस्थीत भाविकांसमोर आपल्या प्रवचन सेवेत केले,
सणसवाडी (ता शिरूर) येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे सणसवाडी सेवा केंद्र, शिरूर तालुका व पुणे जिल्हा सेवा समिती आयोजीत भव्य नामजागर व प्रवचन सोहळा शिवम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न नामजागर सोहळ्यात बोलताना नरेंद महाराजाचे ' अरे अरे माणसा , घडीचा ना भरोसा । तरी बेफीकीर कैसा -' या अभंगावर बोलताना सोदाहरण सांगीतले . 'दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे, माजी सरपंच दता हरगुडे , सुरेश हरगुडे व भक्तगण भावीकांचे हस्ते नरेद्रामहाराजांचे प्रतिमा पुजन करून या सोहळ्यास शुभेच्छा देण्यात आल्या . मयुर गुरुजी यांचे हस्ते पुजापाठ करून आरती घेणेत आली . पुजेचे यजमान सणसवाडी सेवाकेंद्राचे अंकुश सितापुरे यांना देवून त्यांचे व इतरांचे हस्ते आरती घेणेत आली ' गण गण गणात गोते ' नामघोषात गोलाकार फेर धरून तासभर नामजागर करणेत आले . सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे यांचे हस्ते पालखीचे पुजन करून सकाळी १0 ते १२ . नरेंद्र महाराजांचे पालखी रथाची मिरवणुक काढून शिवम हॉलमध्ये मयुर गुरुजी व मान्यवरांचे हस्ते पाद्यपुजन करणेत आले . नाम जागरानंतर नानीजधामचे व्यवस्थापक शैलेशजी काळे सर यांची दुपारी ३ते ४ प्रवचन सेवा झाली . महाप्रसादाने नामजागर सोहळ्याची सांगता झाली .