वाबळेवाडी शाळेतील तब्बल २७ विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृती

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २७ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहेत.    
 *गुणवत्ता यादीत आलेले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-* पार्थ बापू डफळ   (१४६ गुण), प्रणव प्रकाश मांढरे (१४० गुण), अथर्व रवींद्र डफळ (१३९ गुण), अपेक्षा निलेश मासळकर (१३६ गुण), हर्षदा जितेंद्र जोशी (१३० गुण), हर्षदा प्रकाश वाबळे (१२९ गुण), अथर्व गणेश टेमगिरे (१२३ गुण), मयुर राजेंद्र गोकुळे (१२२ गुण), श्रेया बाबाजी राऊत (१२१ गुण), अस्मिता ज्ञानेश्वर तांबे (१२० गुण), संस्कृती शंकर पावसे (११७ गुण), सृष्टी अविनाश शेवाळे (११७ गुण), यशराज इंगळे (११६ गुण), पायल अरुण ठोंबरे (११६ गुण), समता गोकुळ मंडलिक (११५ गुण), किरण भाऊसाहेब तांबे (११५ गुण), अनुष्का मंगेश खैरे (११३ गुण), स्नेहा सुनिल जाधव (११० गुण), मैथिली दत्तात्रय बारगळ (१०९ गुण), ओम महारुद्र काळे (१०८ गुण), ओम दिनेश पुजारी (१०७ गुण), नम्रता नामदेव राऊत (१०५ गुण), सृष्टी संतोष थिटे (१०३ गुण), सिद्धेश राजकुमार गवारी (१०२ गुण), ओम दयानंद कोरे (९५ गुण), जीवन नितीन नर्के (९४ गुण), यश वासुदेव जाधव (९२ गुण). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ जयश्री पलांडे आणि सुनिल पलांडे यांनी मार्गदर्शन केले. सदर परीक्षेसाठी कोरोनाचे वातावरण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या पलांडे दाम्पत्याने या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे, शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश  वाबळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, माजी उपसरपंच भगवान वाबळे, केशवराव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व  मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!