शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुकाराम बेनके यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी रामदास थिटे तर सचिवपदी मारुती कदम यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुवार (दि. १ सप्टेंबर) रोजी शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त अरुण थोरात यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेसाठी तालुक्यातून ७५ मुख्याध्यापक उपस्थित होते. या बैठकीत शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सन २०२२ ते २०२५ साठी कार्यकारिणी जिल्ह्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडण्यात आली.
या निवडणुकीसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त अरुण थोरात, आदिनाथ थोरात, हरिचंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष मधुकर नाईक, उपाध्यक्ष कल्याण बर्डे, सचिव प्रसाद गायकवाड यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
*शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-*
तुकाराम बेनके (अध्यक्ष), रामदास थिटे (कार्याध्यक्ष), अनिल शिंदे (उपाध्यक्ष), विलास घोडे (उपाध्यक्ष),
बाळासाहेब चव्हाण (उपाध्यक्ष), तुकाराम शिरसाट (उपाध्यक्ष), रामनाथ इथापे (उपाध्यक्ष), मारुती कदम (सचिव), प्रकाश गावडे (सहसचिव), अशोक सरोदे (सहसचिव), नामदेव चौधरी (विद्या सचिव), डॉ. शाहिद शेख (विद्या सहसचिव), संजीव मांढरे (विद्या सहसचिव), अविनाश क्षीरसागर (खजिनदार), बापूसाहेब लगड (सह खजिनदार), सतीश पोटे (हिशोब तपासणी), आप्पासाहेब कळमकर (आय-व्यय निरीक्षक), माणिक कुंभारकर (सदस्य), चंद्रकांत वाव्हळ (सदस्य), अनिल साकोरे (सदस्य), शोभा भोसले (सदस्या), सुवर्णा चव्हाण (सदस्या), दिव्या जांभळकर (इंग्रजी माध्यम प्रतिनिधी),
स्नेहलता यादव (इंग्रजी माध्यम प्रतिनिधी), सुनीता करपे (आश्रम शाळा प्रतिनिधी), बाबासाहेब गोरे (विश्वस्त), सुभाष साबळे (विश्वस्त), योगेश जैन (विश्वस्त). सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. संघटनेतील सर्व मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष तुकाराम बेनके यांनी सांगितले. सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती कदम यांनी केले. रामदास थिटे यांनी स्वागत केले. तुकाराम शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले तर तुकाराम बेनके यांनी आभार मानले.