सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
भारत महासत्ता बनत अस ल्याचा वल्गना नेत पुढारी सभा भाषणात जोसात करत असताना आजही २५ % रयतेचं भवितव्य अधांतरी असल्याचं चित्र गावोगावी दिसत आहे . सणसवाडी (तालुका शिरूर) चौकात बसस्टाप चौकात हायवे लगत सकाळ सकाळ मजुर रोजंदारी मिळण्यासाठी गर्द्दी करून दाटीवाटीत उभे असतात . ईतभर पोटासाठी जगण्याच्या धडपडीत त्यांतील निम्या अर्ध्याना काम मिळते पण त्यातल्या निम्म्यांना रोजगार मिळत नाही व परीवारांवर उपासमारीची वेळ येते
तिकडे स्मार्ट सिट्या - डिजीटल इंडियाच्या बाता मारणाऱ्यांनी इकडे लक्ष देणेची गरज आहे . एका ठेकेदाराने पॅको लाईन कंपनीत बिगारी नेले व दोन महिने मजुरीच दिली नाही , त्या मजुराने ती मागता त्याने अरेरावीची भाषा करता वाद शिवीगाळ भांडने झाली . आता अशा कित्येक मजुरांचे घामाचे दाम मिळत नसतील तर जगायचे कसे हा यक्षप्रश्न आहे .