सुनील भंडारे पाटील
पुणे - नगर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता
नूतनीकरण, रुंदीकरणाचे काम चालू आहे, ठेकेदाराच्या हलगर्जीपनामुळे, रस्ता
दुभाजक पट्ट्यावर झाडे लावण्यासाठी लोणीकंद व वाघोली दरम्यान माती
भरण्याची काम चालू आहे, परंतु संबंधित पट्ट्यात, मोठमोठे दगड, राडा रोडा
तसाच आहे, तो साफ करून माती भरणे गरजेचे असताना, ठेकेदाराकडून हलगर्जीपणा
करत, तशीच माती भरली जात आहे, संबंधित
महामार्गावर कोट्यावधी रुपये खर्चून रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून
धीम्यागतीने चालू आहे, या मार्गावर अनेक प्रश्न प्रलंबित असताना, शिवाय,
रहदारी, मोठे औद्योगीकरण, महत्त्वाचा केंद्रीय महामार्ग या गोष्टी पाहता हा
मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना,
ठेकेदारांकडून काही कामांमध्ये कुचराई व हलगर्जीपणा केल्याचा दिसत आहे,
पुण्याकडे येणारे आणि जाणाऱ्या या दोन्ही बाजूंच्या तीन-तीन पट्ट्याच्या
मध्ये संपूर्णपणे रस्ता दुभाजकाचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये झाडे झुडपे,
शुशोभीकरणासाठी माती भरण्याचे काम चालू आहे, परंतु या पट्ट्यामध्ये मोठ
मोठे दगड, इतर राडारोडा साफ न करता त्यावर माती टाकून तसेच गाडले जात आहे,
असे निदर्शनास आले आहे, या पट्ट्यामध्ये दगड व इतर घाण साफ करून नंतरच माती
भरली जावी अशी मागणी जनतेकडून होत आहे,
सार्वजनिक
बांधकाम विभागाचे अधिकारी एस एम बलसेटवर यांनी सांगितले की, मी ठेकेदाराशी
बोलून त्याला डिवाइडर मधील दगड व इतर घाणघून साफ करायला सांगतो, त्यानंतर
माती टाकली जाईल तशा सूचना देतो,
संबंधित महामार्ग कामाचा ठेकेदार श्री बेल्हेकर यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,