रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
पिंपरी दुमाला (तालुका शिरूर) येथील ग्रामसेवकाच्या विरोधात पदाधिकारी असा संघर्ष चालू झाला आहे. कारण पिंपरी दुमाला गावच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या बदलीसाठी थेट पंचायत समितीत अर्ज सादर केला आहे.
त्याच बरोबर या अर्जाच्या प्रती माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील , जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर-पाटील यांनाही दिल्या आहेत.
विशाल भाऊसाहेब ढसाळ असे या बदलीसाठी अर्ज केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. सदर ग्रामसेवका बाबत पदाधिका-यांनी केलेल्या तक्रारी मध्ये प्रामुख्याने गावासाठी आणलेला विकास निधी वापरताना ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेणे , मनमानी पद्धतीने कामकाज करणे ? फोनवरून संपर्क केला असता फोन न घेणे ? फोन बंद असणे किंवा मीटिंगमध्ये असल्याचे कारण सांगणे , कामकाजात टाळाटाळ करणे , उडवाउडवीची उत्तरे देणे , ग्रामसभा , मासिक सभा यामध्ये झालेले विषय तसेच केलेले ठराव ठरल्याप्रमाणे न घेता मनमानी पद्धतीने काम करणे त्यामुळे पिंपरी दुमाला येथील पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या बदलीचे रणसिंग फुंकले आहे. याबाबत विद्यमान उपसरपंच जयश्री सोनवणे माजी उपसरपंच माणिक माळसकर ग्रामपंचायत सदस्य शरद खळतकर निकिता खेडकर तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिखले यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.