सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा, सणसवाडी (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये परतीचा वळवाचा, ढगफुटीमुळे जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत,
गेल्या चार दिवसापासून या भागामध्ये दिवसभर ऊन पाऊस, आणि सायंकाळी मात्र जोरदार पाऊस होत आहे, त्यामुळे या अतिरिक्त ढगफुटींच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत तर झाले आहे, परंतु शेती पिकावर मोठा परिणाम होणार असून, तरकारी व इतर पिके हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत, महागाईने त्रासलेला शेतकरी, शेती उत्पन्नासाठी खर्च पाचपटीने वाढलेला असून आता या ढगफुटीच्या अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र हाती आलेले पीक जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, मात्र ऊस पिकाला हा पाऊस फायद्याचा होणार आहे, परिसरातील गावांमधील ओढ़े नाले गच्च भरून वाहत आहेत, त्यामुळे काही तासांसाठी गावांचा संपर्क तुटत आहे, गावांना जोडणारे रस्ते, पुराच्या पाण्यामुळे बंद होत आहेत, निसर्गापुढे इलाज नाही आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे शिवाय गत्यंतर नसल्याचे लोकांनी बोलून दाखवले, अत्यंत मुसळधार होणारा पाऊस नित्यन्यामध्ये रोज संध्याकाळी हजेरी लावत आहे,