गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
मंचर पोलीस स्टेशन यांच्या वतीने सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की,
अनंत चतुर्दशी निमित्त
होणारे गणेश विसर्जनाचे अनुशंगाने मंचर पोलीस स्टेशन हददीत असणारे पुणे नाशिक हायवे रोडवर वाहतुक कोंडी होवुन नागरीकांची गैरसोय होवु नये याकरीता प्रशासनाचे वतीने उदया दिनांक 09/09/2022 रोजी पुणे बाजुकडुन नाशिक बाजुकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहने ही भोरवाडी येथुन बायपासने वळविण्यात आलेली असुन नाशिक बाजुकडुन येणारी सर्व वाहने जुने पुणे नाशिक हायवे रोडनेच प्रवास करतील. तरी सदरचा बायपास हा फक्त उदयाचे दिवसच चालु ठेवण्यात आलेला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व आपली गैरसोय टाळावी असे मंचर पोलीस स्टेशनचे वतीने सर्व नागरीकांना आव्हाहन करण्यात येत आहे.